We Provide
Chutney
Pickles
Whole spices
Powder spices
Product Portfolio
Previous
Next
Media Center
The Video Which Explains about the Swadhh masaale and testimonials from the our customers with lots of information.
Our Products
Best Seller
The flavor of something special
Previous
Next
Special Moments
तीच प्रेरणा,तोच उत्साह, शालेय क्रीडा स्पर्धांचा उत्सव आणि मन भारावून टाकणारा जल्लोष,अन बक्षिसांची प्रचंड ओढ. लहान मोठ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचा शिस्तबद्ध जल्लोष पाहून शाळेतील जुन्या आठवणी जाग्या झाल्या,ज्या शाळेने, गुरुजनांनी मला घडवले त्यांच्यासमोर व्यक्त होणे, गुरुजनांच्या पापण्यांच्या कडा आपल्यासाठी पाणावणे हे किती थोर भाग्य. ज्यांनी सदैव आशीर्वाद शुभेच्छा दिल्या ते क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख आमदार अरुण अण्णा लाड, क्रांती इंटरनॅशनल स्कुल चे अध्यक्ष किरण लाड तात्या, गुरुवर्य रोकडे सर, उद्योजिका दिपाली पवार, मुख्यध्यापक श्री सी.वाय. जाधव सर, आमचे सहकारी मित्र श्री वैभव लाड सर, श्री नितीन जाधव सर, श्री प्रशांत आवटे, श्री महिंद सर, संस्थेचे खजिनदार श्री गोविंद नाना डूबल उप मुख्याद्यापिका सौ पट्टणशेटी मॅडम, प्रभारी मुख्यध्यापक श्री अरुण सावंत सर, व समोर प्रचंड ऊर्जा देणारा विद्यार्थ्यांचा सागर. भावी ऑलम्पिक विजेते विद्यार्थी. खूप समाधान. प्रतिनिधी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, व्यवसाय अभ्यासक्रम, माध्यमिक विद्यालय, कुंडल यांच्या संयुक्त वार्षिक क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ काल सुंदर पार पडला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई यांच्या वतीने मुंबई येथे उद्योजक मार्गदर्शन मेळावा आयोजित करणेत आला होता,यावेळी उपस्थित भारत सरकार CAT चे अध्यक्ष, प्रवीण खंदेवल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई च्या प्रमुख संगीता पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, पौर्णिमा शिरिशकर, आमचे मार्गदर्शक बाळासाहेब सोळंकुरे पाटील, व महाराष्ट्र सह परराज्यातील 200 हुन अधिक उद्योजक सहभागी झाले होते, या मध्ये सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची व महाराष्ट सह परराज्यातील उद्योजक यांच्याशी सवांद साधण्याची संधी मिळाली, धन्यवाद बाळासाहेब पाटील सर,पौर्णिमा सिरिस्कर मॅडम.
TLC BIG BASH 2023 मध्ये स्वाद मसाले पलूस चा OVERALL EXCELLENCE AWARD ने गौरव, कोल्हापूर येथे गेल्या दोन दिवस पासून सुरू असलेल्या बिग bash 2023 मध्ये पश्चिम महाराष्ट्र मधून साधारण 300 उद्योजक यांच्या मधून या वर्षीच्या OVERALL EXCELLENCE AWARD मिळाला. हा पुरस्कार स्वाद मसाले च्या सर्व स्टाफ ला समर्पित करीत आहे, त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर स्वाद मसाले ने पहिलाच वर्षी अप्रतिम व्यवसाय वाढ करून हा पुरस्कार मिळवला.
आयडियल ट्रेनिंग सेंटर सांगली व जिल्हा कृषी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नवीन उद्योजकांच्या तीन दिवशीय कार्यशाळेमध्ये नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी योग आला. या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये 69 नवीन उद्योजकांनी भाग घेतला असून प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय निवडले आहेत.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात मार्फत अशा पद्धतीचे ग्रामीण भागातील महिला, तरुण उद्योजक, बचत गट यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणलेल्या आहेत.यावेळी आयडियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सांगलीचे सर्वेसर्वा व आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर कैलास पाटील सर, संचालिका सुनिता पाटील मॅडम, युवा उद्योजक हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील व कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते या वेळेला स्वाद मसाल्याच्या वतीने सुरू असलेल्या अनेक योजनांची माहिती नवीन उद्योजक यांना दिली. लवकरच स्वाद मसालेच्या वतीने नवीन उद्योजकांच्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला परदेशामध्ये बाजारपेठ मिळवून देण्याचे या वेळेला सांगण्यात आले.
मुंबई येथील पत्रकार भवन, आझाद मैदान, येथे मुंबई व्यापारी असो व महाराष्ट्र रोजगार फोरम यांनी आयोजीत केलेला महाराष्ट्रातील निमंत्रित उद्योजकांचा मेळावा 2022 पार पडला. महाराष्ट्रातील नविन मराठी तरुणांनी आपल्या उभा केलेल्या व्यवसायला गती देण्याच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये संधी देण्यासाठी व फ्रांचाईझीं, तसेच distributorship यासाठी आयोजन करणेत आले होते. महाराष्ट्र मधील 300 उद्योजक यांनी आपला महत्वपूर्ण सहभाग नोंदवला, सांगली जिल्हामधून स्वाद मसाले उद्योग यांना प्रतिनिधित्व करणेची संधी मिळाली, या ठिकाणी स्वाद मसालेच्या Food Van ची संकल्पना मांडली अन ती सर्वांना आवडली,ज्या महिला व पुरुष याना स्वाभिमानाने एक यशवी उद्योजक व्हायचंय त्यांच्या साठी स्वाद मसाले ने आपली पहिली Food Van ची फ्रांचाईझीं ओपन केली, या व्हॅन ला खूप छान प्रतिसाद मिळाला, स्वाद मसाले लवकरच अजून महाराष्ट्र मधील नवीन उद्योजक यांना जी अनोखी संधी आणलीय याचं सर्वांनी खूप कौतुक केलेच व महाराष्ट्र उद्योजक सन्मान पुरस्कार 2022 ने सन्मानित करणेत आले. सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महानगरपालिका स्वाद मसाले सोबत लवकर च काम सुरू करत असून याबाबत करार होत आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोनकीरे ता.कडेगाव येथे उद्योजक महिला मेळावा संपन्न. सोनकीरे येथे उदयोजक महिला मेळाव्याचे आयोजन करणेत आले होते,यावेळी स्वाद मसालेच्या दिपाली पवार कुंडल या उपस्थित होत्या. ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन व्यवसाय सुरू करावा व युवा पिढीला व्यवसायाची आवड निर्माण होऊन त्यांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ कशी उपलब्ध आहे याबद्दल मार्गदर्शन करून जागतिक बाजारपेठेत तसेच भारतात महाराष्ट्रातील पदार्थाना कशी मागणी आहे याबाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी यशश्री ग्राम संघ सोनकीरे, गणेश स्वयंसाह्यता महिला समूह सोनकीरे, यांच्या प्रमुख सोनाली पाटील, CRP कल्पना यादव, रुपाली निमकर, कोषाध्यक्ष सारिका गुरव, रेखा माळी, माया कुंभार, मीना बामनाळे या उपस्थित होत्या, कृष्णा वेरला सूत गिरणीचे अधिकारी अशोक पाटील, व संतोष लाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Testimonials
What our Customer Says About Us.What the say after trying our products .
Read More
स्वाद मसाल्याची मसाले खाऊन जीवनात चव आली आणि घरच्या जेवणाला एक वेगळीच मजा आली घरी जीव वाटला आम्हाला सगळ्यांना आणि खूप छान मसाले होते.
Read More
आम्ही परदेशात राहून सुद्धा आम्हाला स्वाद मसाल्याची मसाले घरपोच मिळाले तेही अगदी व्यवस्थित सगळ्या चवीनुसार आणि सगळ्या गोष्टी नुसार त्यामुळे स्वाद मसाल्याची आम्ही खूप खूप आभारी आहोत की आम्हाला वेगळ्या देशात राहूनही तिचं आम्हाला त्यांनी दिली.
Previous
Next
Our Legacy
1
+
Countries
1
+
Products
3000
+
Happy Customers
1
+
Employees
1
+
Unique Formulae
0
+
Women's Empowered